Whats new

सरकारकडून 6,050 कोटींच्या एफडीआयला मंजुरी

 fdi

केंद्र सरकारने 6,050 कोटी रुपयांच्या पाच प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक प्रस्तावांना (एफडीआय) मंजुरी दिली आहे. वरिष्ठ सरकारी अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, विदेशी गुंतवणूक संवर्धन बोर्ड एफआयपीबी 21 डिसेंबरला घेण्यात आलेल्या बैठकीतील शिफारशींच्या आधारावर सरकारने एकूण 6,050.10 कोटी रुपयांच्या एफडीआय प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या प्रस्तावांमध्ये स्वीडनची फार्मा कंपनी रेसिफार्म पार्टिसिपेशन बीवीचे भारतात उपकंपनी स्थापन करण्याच्या योजनेचा समावेश आहे. औषध कंपनीने 1,050 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. याच्या अंतर्गत भारतामध्ये त्यांची कंपनी डब्लूयूओएसद्वारा लाइफ सायन्समध्ये प्रवर्तकचा पूर्ण हिस्सा खरेदी करणे आणि विदेशी कंपनीमध्ये विदेशी हिस्सेदारी वाढवून 74 टक्के करणे याचा समावेश करण्यात आला आहे. याच्यासह बुईमर्क कोर इनवेस्टमेंट्स प्रायवेट लिमिटेडमध्ये एनआरआय गंतवणूकदार आणि स्थानिक गुंतवणूकदार यांचे 100 टक्के समभाग (शेअर्स) बुमर्क कॉर्पोरेशन एफजेडईला हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाचाही यामध्ये समावेश आहे. यामध्ये 10 लाख रुपयांची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक होणार आहे. सरकारने हेल्थ मीडिया पब्लिशिंग प्रायवेट लि. चे 90.90 टक्के समभाग वेलनेस टेक्नोलॉजी अँड मीडिया पीटीवी लि. अमेरिकेला स्थानांतरित करण्यास मंजुरी दिली आहे.