Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

टी-२० स्पर्धेत १२ चेंडूंत अर्धशतक, गेलची युवराजच्या विक्रमाशी बरोबरी

 GAYLE

ख्रिस गेलने मैदानावर झंझावात दाखवून देत बिग बॅश टी-२० स्पर्धेत १२ चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याने टी-२० मधील वेगवान अर्धशतकाच्या युवराजच्या विक्रमाशी बरोबरी केली. यानंतरही मेलबर्न रेनीगेड्स संघाला २७ धावांनी पराभव पत्करावा लागला. मेलबर्नचा डाव १४३ धावांत संपुष्टात आला. गेलने १२ चेंडूंत अर्धशतक, तर १७ चेंडूंत ७ षटकार आणि २ चौकारांसह ५६ धावा केल्या. बारा चेंडूंत त्याने २,६,६,६,६,२,६,६ (फ्री-हिट), ४,१,६ अशा धावा केल्या. युवराजने टी २० विश्वकरंडक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडला सलग सहा षटकार ठोकले होते.

असे झाले अर्धशतक-
गोलंदाज : वेस्ट
०.१ : वाइड
०.२ : दोन धावा
०.३ ते ०.६ : चार षटकार
गोलंदाज : नेस्टर
१.६ : दोन धावा
गोलंदाज : लाफलिन
२.२ : षटकार (नो बाल)
२.२ : षटकार
२.३ : चौकार, २.४ : १ धाव
गोलंदाज : हेड
३.१- षटकार