Whats new

अहमदनगरचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांना कर्मयोगी पुरस्कार प्रदान

 KULKARNI

शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा भावनिक एकात्मतेचा ‘कर्मयोगी’ पुरस्कार यंदा अहमदनगर येथील ‘स्नेहालय’ संस्थेचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी यांना जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कर्मयोगी पुरस्कारातून मिळालेल्या एक लाखाच्या रकमेतून कुडाळ येथील प्रकल्पाच्या जमिनीचे काम करणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगत, या प्रकल्पास प्राचार्य पी. बी. पाटील यांचे नाव देणार असल्याचे जाहीर केले. या वेळी उपस्थित असलेले शांतिनिकेतनचे माजी विद्यार्थी, गौतम पाटील यांचे वर्गमित्र आणि सांगलीतील उद्योजक राजू शेख यांनी कुलकर्णी यांना पुरस्कारासाठीची रक्कम फौंडेशनच्या कामासाठी वापरण्याचे आवाहन करत कुडाळ येथील प्रकल्पासाठी स्वत:हून एक लाखाची देणगी जाहीर केली.