Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

टाइपरायटर होणार इतिहासजमा, जून महिन्यात होणार अखेरची परीक्षा

 TYPE

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जून महिन्यात टाइपरायटरवर अखेरची परीक्षा होणार आहे. यापुढे आता टायपिंगच्या परीक्षा संगणकावर घेण्याचा निर्णय २ जानेवारी रोजी घेण्यात आला. प्रगत तंत्रज्ञानाचा मुद्रण यंत्राला फटका बसला असून, हे यंत्र आता इतिहासजमा होणार आहे.

गत अनेक वर्षांपासून टाइपरायटर शासकीय कार्यालयांचे हे अविभाज्य घटक होते. कार्यालयाच्या कामकाजाचा आत्मा असलेल्या टाइपरायटरची आता अखेरची घटका जवळ आली आहे. आधुनिकतेची कास धरत टाइपरायटर बंद करून संगणकावर टायपिंगची परीक्षा घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने २0१३ साली घेतला होता. तेव्हापासून संगणक आणि टाइपरायटर अशा दोन्ही परीक्षा सुरू होत्या. आता टाइपरायटरवरची शेवटची परीक्षा जून २0१५ ला घेण्यात येणार असून, त्यानंतर टाइपरायटरची टिकटिक कायमची बंद करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे.

पेपरलेस कार्यप्रणाली
१८७0 मध्ये हॅन्सन बॉल याने पहिला व्यावसायिक टाइपरायटर तयार केला. कालांतराने या टाइपरायटरकडे शासकीय कामकाजाची धुरा आली. पुढे हे मुद्रण यंत्र शासकीय कामकाजाचा आत्माच बनले. शासकीय नोकरी मिळवण्यासाठी टायपिंगशिवाय पर्याय नसल्यामुळे दहावीनंतर पुढचे शिक्षण घेताना टायपिंग करून घेऊ असा सल्ला मुलांना हमखास दिला जायचा. कितीही शिकला तरी टायपिंग असल्याशिवाय नोकरी लागत नव्हती. त्यामुळे दहावीनंतर विद्यार्थ्यांचा ओढा टायपिंग करण्याकडे असायचा. त्यामुळे टायपिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी असायची. सकाळी ६ पासून रात्री १0 पर्यंत संस्थांमध्ये बॅचेस चालायच्या. टायपिंग क्लासला प्रवेशासाठी रांगा लागायच्या.

संगणकाच्या आगमनानंतरही जवळपास २000 सालापर्यंत टायपिंगचा प्रवास बर्यापैकी सुरू होता; परंतु संगणकीय क्रांतीमुळे टायपिंग संस्था ओस पडू लागल्या. विद्यार्थ्यांची गर्दी कॉम्प्युटरच्या प्रशिक्षणाकडे वळू लागली. शासकीय कामकाजातसुद्धा संगणक शिरल्यामुळे टायपिंग मशीन बनवणार्या कंपन्या बंद पडू लागल्या. पेपरलेस संकल्पनेमुळे संगणकीय टंकलेखनावर भर देण्यात आला. परिणामी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टाइपरायटरला ब्रेक दिला.