Whats new

बिहारमध्ये महिलांना मिळणार ३५ टक्के आरक्षण, कॅबिनेट बैठकीत निर्णय

 BIHAR

बिहारमधील नितीशकुमार सरकारने सरकारी नोक-यांमध्ये महिलांना ३५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला. सर्वच शासकीय नोक-यांमध्ये महिलांना हे आरक्षण मिळणार आहे. ज्या क्षेत्रांमध्ये महिलांना आरक्षण आहे, ते तर कायम राहीलच, शिवाय ज्या क्षेत्रांत आरक्षण नव्हते, ती ते क्षेत्रही सरकारने महिलांसाठी खुले केले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.