Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

केंद्रीय आरोग्य खात्याने केले मेलामाइनचे प्रमाण निश्चित; सात वर्षांनंतर चिनी चॉकलेटवरील बंदी उठण्याची शक्यता बळावली

 CHINA

दुग्धजन्य पदार्थ आणि चॉकलेटमधील मेलामाइन घटकाचे प्रमाण निश्चित केल्याने गेल्या सात वर्षांपासून बंदी असलेल्या चिनी चॉकलेटसाठी भारतीय बाजारपेठेची दारे पुन्हा उघडी होणार आहेत. पावडर, द्रवपदार्थ आणि इतर अन्न पदार्थ अशी वर्गवारी करून केंद्रीय आरोग्य खात्याने त्यातील मेलामाइनचे प्रमाण निश्चित केले आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने दुग्धजन्य पदार्थ, चॉकलेट, कॅंडीज अशा पदार्थांमधील मेलामाइनचे प्रमाण निश्चित केले आहे. त्यामुळे आतापर्यंत मेलामाइन घटक असलेल्या पदार्थांवर भारतीय बाजारपेठेत बंदी आहे. ही बंदी या निर्णयानंतर मागे घेतली जाईल.

खाद्य पदार्थांमध्ये मेलमाइनवर आतापर्यंत बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे हा घटक असलेले चिनी चॉकलेट जप्त करण्यात आली आहेत. केंद्रीय आरोग्य खात्याने आता मेलामाइनचे प्रमाण निश्चित केले आहे. त्यात पावडर, द्रव पदार्थ आणि इतर अन्नपदार्थ अशी वर्गवारी केली आहे. एक किलो पावडरमध्ये एक मिलीग्रॅम, द्रव पदार्थात 0.15, तर इतर पदार्थांमध्ये 2.5 मिलीग्रॅम मेलामाइन वापरण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. यापेक्षा जास्त प्रमाण आढळल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा आणि मानदे कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. केंद्राने मेलामाइनबाबत घेतलेल्या निर्णयामुळे ही बंदी मागे घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातून चिनी चॉकलेटला पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठ खुली होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

काय आहे मेलामाइन?
अन्न पदार्थांमधील प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी मेलामाइन या रासायनिक घटकाचा वापर करण्यात येत होता. पदार्थांचे विश्लेषण करताना त्यात प्रथिनांचे प्रमाण निश्चित करता येत नाही. त्यामुळे नायट्रोजनच्या आधारावर पदार्थातील प्रथिनांचे प्रमाण सांगितले जाते. त्यातून मेलामाइन टाकून प्रथिनांचे प्रमाण वाढल्याचे विश्लेषणातून पुढे आले होते.

काय होते मेलामाइनमुळे?
मेलामाइन हा घटक मोठ्या प्रमाणात शरीरात गेल्यास त्याचा थेट परिणाम माणसाच्या पाचनशक्तीवर होतो. त्यातून मूत्रपिंडाचे कार्य बंद होण्याचा धोका असतो. तसेच, कर्करोग होण्याचीही शक्यता असते.

मेलामाइनला परवानगी का दिली?
प्रतिकिलो पावडरमध्ये 1 मिली ग्रॅम इतकेच मेलामाइन वापरण्यास परवानगी दिलेली आहे. हे प्रमाण नगण्य आहे. त्यातून शरीरात आवश्यक धातू मिळतो. त्यामुळे ते निश्चित प्रमाणात वापरण्यास मान्यता दिली आहे.