Whats new

तब्बल २६ वर्षांनंतर श्वान पथक करणार प्रजासत्ताक दिनी संचलन

 DOG SQUAD

तब्बल २६ वर्षांनंतर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राजपथावर एक श्वानपथक संचलन करणार आहे. भारतीय जवान आणि पोलिस यांच्या महत्त्वाच्या कामात मदत करणरे श्वान यांच्या गौरवास्पद कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राजपथावर एक श्वानपथक संचलन करणार आहे.

१९६० मध्ये मेरठमध्ये श्वानांसाठी एका प्रशिक्षण केंद्राची सुरुवात केली होती. या ठिकाणी श्वानांना आणि त्यांच्या ट्रेनर्सना बॉम्ब शोधणे, ड्रग्ज शोधणे इत्यादी कारवायांसंबंधीचे ट्रेनिंग दिले जाते. २०१५ च्या ऑगस्ट महिन्यात काश्मीरमध्ये एका मानसी नावाच्या श्वानाने आणि तिच्या ट्रेनरने दहशतवाद्यांशी लढताना प्राणांची आहुती दिली होती. अशीच कामगिरी दरवर्षी अनेक श्वान करतात. त्यांच्या या कामगिरीबद्दल गौरव म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये एका श्वानपथकाचे संचलन ठेवले आहे.