Whats new

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तंत्रज्ञान देवघेव करार

 IND-AUS

भारत आणि ऑस्ट्रलियामध्ये मेक इन इंडिया अंतर्गत तंत्रज्ञान देवाणघेवाणीचा करार झाला आहे. एकमेकांना गोपनीय तंत्रज्ञान देण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. याअंतर्गत लिग्नाइट कोळशाचा वापर करून वीजनिर्मिती आणि पोलाद उत्पादन करण्यासाठीचे तंत्रज्ञान ऑस्ट्रेलिया भारताला पुरवणार आहे. या तंत्रज्ञानाद्वारे कार्बनचे कमी प्रमाणात उत्सर्जन होते. या करारामुळे दोन देशांमधील ऊर्जा क्षेत्रातील संबंध अधिकच दृढ झाले असून, भारताच्या मेक इन इंडिया मोहिमेलाही बळ मिळणार असल्याचे ऑस्ट्रेलियाचे दक्षिण भारतातील वाणिज्यदूत सीन केली यांनी सांगितले आहे.