Whats new

सत्यपाल महाराज यांना शासनाचा समाजप्रबोधनकार पुरस्कार

 SATYAPAL

आकोट येथील सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज चिंचोळकर यांना कीर्तन क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाचा समाजप्रबोधनकार पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक मंडळाच्या वतीने रत्नागिरी येथे एका कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला शिक्षणमंत्री तथा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. आकोट येथील सत्यपाल महाराज हे आपल्या सप्तखंजिरीच्या माध्यमातून सातत्याने समाज प्रबोधन करीत आहेत. विविध विषयांवर ते अहोरात्र समाजजागृतीचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल राज्य शासनाच्या सांस्कृतिक मंडळाच्या वतीने घेण्यात आली आहे. एक लाख रुपये, मानचिन्ह मानपत्र व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.