Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

थिसारा परेराचा कसोटी क्रिकेटला अलविदा

 PARERA

श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेराने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटीतून जरी निवृत्ती स्वीकारली असली, तरी वनडे व टी 20 क्रिकेटमध्ये आपण खेळत राहू असे परेराने सांगितले. 26 वर्षीय परेराने लंकन क्रिकेट मंडळाला पत्र लिहीत आपल्या निवृत्तीची माहिती दिली. 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीमध्ये पुनरागमन करणा-या परेराने सहा कसोटी खेळल्या आहेत. सहा कसोटीत त्याने 203 धावा केल्या असून, 11 बळी घेतले आहेत.