Whats new

भारतीय वंशाचे राहुल ठक्कर यांना ‘ऑस्कर’चे नामांकन

 RAHUL

भारतीय वंशाचे अभिनेता-निर्माता राहुल ठक्कर यांना तंत्रज्ञान क्षेत्रातील ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त झाले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पुरस्कार येत्या 13 फेब्रुवारीला घोषित करण्यात येतील. ऑस्कर पुरस्काराच्या वेबसाइटवरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, राहुल ठक्कर आणि रिचर्ड चुआंग यांना एकत्रित स्वरुपात ‘ग्राउंड ब्रेकिंग डिझाइन’साठी सन्मानित करण्यात आले.

वेबसाइटवरील माहितीनुसार, लिओनार्डो डिकॅप्रियो यांचा चित्रपट ‘द रेव्हनेंट’ या सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेता आणि निर्माता यांसाठी पुरस्कार नामांकन प्राप्त झाले आहेत. ‘द रेव्हनेंट’बरोबरच ‘मॅड मॅक्स’ या चित्रपटालाही नामांकित करण्यात आले.