Whats new

दिलीप शिंदे, प्रदीप तरकसे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार

 REPORTER

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे दिल्या जाणा-या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात दिलीप शिंदे आणि प्रदीप तरकसे यांना तावडे यांच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने गौरवण्यात आले. स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

लहान-लहान खेड्यांमधूनही पत्रकारांचे चांगले काम सुरू असते. अशा पत्रकारांचा मंत्रालयातील पत्रकार संघातर्फे गौरव होणे ही त्यांच्या चांगल्या कामाची दखल आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरात पत्रकारिता करणे सोपे आहे. शहरांत राजकीय दबावही नसतो. त्या तुलनेत ग्रामीण भागात राजकीय दबावात पत्रकारिता करणे अवघड असते. अशा परिस्थितीत धाडस दाखवत जिकिरीने काम करणे, सरकारवर अंकुश ठेवणे, सकारात्मक बाजूही समाजासमोर मांडणे ही चोख भूमिका पत्रकार बजावत आहेत. त्यामुळे अशा पत्रकारांचा गौरव होणे ही अभिमानाची बाब आहे. त्यातही मंत्रालयातील पत्रकार संघातर्फे त्यांचा गौरव होणे ही या पत्रकारांनी केलेल्या चांगल्या कामाची दखल आहे, अशा शब्दांत तावडे यांनी या वेळी पुरस्कारप्राप्त पत्रकारांचे कौतुक केले.