Whats new

विक्रम लिमये पुण्याच्या गोखले इन्स्टिटय़ूटच्या संचालकपदी

 VIKRAM

पायाभूत क्षेत्राला वित्तपुरवठा करणा-या आघाडीच्या संस्थापैकी एक आयडीएफसी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यांची पुणे येथील गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटिक्स अॅण्ड इकॉनॉमिक्स या प्रतिष्ठित संस्थेच्या संचालकपदावर नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. लिमये यांची संचालक म्हणून ही नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी असेल. भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या या कंपनीचे नुकतेच देशाच्या बँक क्षेत्रातही पदार्पण झाले आहे. स्व. गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेल्या ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’मार्फत १९३० मध्ये गोखले या शैक्षणिक संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेला १९९३ मध्ये अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे.