Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

प्रियंका-अमिताभ असतील ‘अतुल्य भारत’चे अॅम्बेसेडर

 BRAND

इन्क्रेडिबल इंडिया कॅम्पेनचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमिताभ बच्चन यांची नावे निश्चित झाली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पर्यटन मंत्रालयाने त्यांना पत्र पाठवले आहे. 26 जानेवारीनंतर दोघांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते.

चार सेलिब्रिटींची नावे होती स्पर्धेत
· सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ, प्रियंकाशिवाय दीपिका पदुकोण आणि अक्षय कुमार यांची नावेही स्पर्धेत होती.
· मंत्रालयाकडून प्रियंका आणि अमिताभला पत्र पाठवण्यात आले आहे.
· एका वेबसाइटनुसार, दोघेही तीन वर्षे इन्क्रेडिबल इंडियासाठी अॅड कॅम्पेन करतील. कॅम्पेनसाठी दोघांनीही कोणत्याही प्रकारचे मानधन घेतलेले नाही.

अमिताभच का...
· सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अड कॅम्पेनसाठी अमिताभ यांनाच पहिली पसंती होती.
· अमिताभ गुजरात सरकारचे ब्रँड अॅम्बेसेडर राहिलेले आहेत. त्या वेळी कँपेन प्रसिद्ध झाले होते.
· अमिताभ वादांपासून दूर असल्याने त्यांची निवड झाल्याचे सांगण्यात येते.

‘इन्क्रेडिबल इंडिया’ नव्हे ‘अतिथि देवो भव:’ चा ब्रँड अम्बेसेडर
· आमिर खानला ज्या जाहिरातीतून हटवल्याचा वाद आहे, ती ‘इन्क्रेडिबल इंडिया’ नव्हे, तर ‘अतिथि देवो भव:’ची होती.
· ‘इन्क्रेडिबल इंडिया’ कॅम्पेन को ‘ओ अँड एम इंडिया’ ने तयार केले होते.
· आमीर ‘अतिथि देवो भव:’ कॅम्पेनचा ब्रँड अॅम्बेसेडर होता.