Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

राज्यात दीनदयाळ उपाध्याय ‘ग्रामज्योती’ योजना लागू

 DINDAYAL

२०१९ पर्यंत नियमित वीजपुरवठा करण्यासाठी केंद्र पुरस्कृत दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना व एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची अंमलबजावणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. या योजनेसाठी राज्य सरकार, ग्रामीण विद्युतीकरण कार्पोरेशन अर्थात आरईसी व महावितरण यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांना प्राधिकृत करण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेच्या अनुषंगाने उभारण्यात येणा-या वीज उपकेंद्रास आवश्यक सरकारी जमिनी महावितरण कंपनीला दीर्घ कालावधीसाठी नाममात्र भाड्याने उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

या योजनेसाठी केंद्र सरकारकडून मंजूर प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के रक्कम अनुदान स्वरूपात मिळणार असून, १० टक्के रक्कम ‘महावितरण’ने उपलब्ध करावयाची आहे. उर्वरित ३० टक्के रक्कम ‘महावितरण’ला वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरूपात घेता येईल. तसेच या योजनेची वैशिष्ट्य़े विहित वेळेत पूर्ण केल्यास अतिरिक्त १५ टक्क्यांपर्यंत वाढीव अनुदान केंद्र सरकारकडून मिळणार आहे.

या योजनेंतर्गत केंद्र सरकारने देशपातळीवर ४३ हजार ३३ कोटींची तरतूद केली. ग्रामीण विद्युतीकरण कार्पोरेशनची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. जिल्हा विद्युत समिती सदस्यांबरोबर विचारविनिमय करून तसेच तांत्रिक व आर्थिकदृष्ट्य़ा आवश्यक व्यवहार्यता तपासून केंद्र सरकारने राज्यातील ३३ जिल्ह्यांसाठी दोन हजार १५३ कोटींच्या ३७ सविस्तर प्रकल्प अहवालास मंजुरी देण्यात आली आहे. त्यात वाहिनी विलगीकरणाच्या एक हजार ६९३ कामांसाठी ७०० कोटी रुपये, वीज प्रणाली सक्षमीकरणासाठी एक हजार ४३४ कोटी रुपये आणि संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत ६९ गावांसाठी १९ कोटी रुपये खर्च करण्यात येतील, असेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले.