Whats new

ईशान्येतील महामार्ग प्रकल्पासाठी जपानचे अर्थसहाय्य

 meghalaya

ईशान्य भारतातील मिझोराम आणि मेघालय राज्यांतील दोन महामार्ग प्रकल्पांसाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जेआयसीए) ने 4000 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात जपानी पंतप्रधान शिंझो अबे यांच्या भारत भेटीनंतर हा निर्णय लगेच घेण्यात आला. या दोन प्रकल्पांचे काम नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एनएचआयडीसीएल) कडून राबवण्यात येणार आहे.

मिझोराममधील एकाच राष्ट्रीय महामार्ग-54 वरील अझवाल ते तुइपांग या 380 किलोमीटर लांबीच्या क्षेत्रात असून, दुसरा प्रकल्प मिझोराममधील राष्ट्रीय महामार्ग 59 वरील तुरा आणि दालु यामधील 40 किलोमीटर अंतराचा आहे. या प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी कॅबिनेटची मंजूरी व कर्ज करारावर सही होणे आवश्यक आहे. 19 मार्ग प्रकल्पांना जेआयसीएकडून कर्ज सहाय्य देण्यात येणार आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून इंफाळ-मोरेह मार्गासाठी कर्जाची चाचपणी चालू आहे. याद्वारे या प्रदेशातील वाहतुकीचे जाळे सुधारण्यात येईल.