Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील १०७ वे हुतात्मा म्हणून शंकरराव तोरस्कर यांच्या नावाची नोंद

 shankarrao toraskar

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील १०७वे हुतात्मा म्हणून शंकरराव तोरस्कर यांच्या नावाची नोंद झाली आहे. सातत्याने शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला तब्बल ५९ वर्षांनंतर न्याय मिळाला आहे.

राज्य शासनाने २०११ साली महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या चळवळीतील हुतात्म्यांची यादी जाहीर केली. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील शंकरराव तोरस्कर यांचे नाव नव्हते. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी राज्य शासनाच्या विविध खात्यांकडे अर्ज-विनंत्या व पुरावे सादर केले. त्यांच्या कष्टाला यश आले. १३ जानेवारी २०१६ रोजी राज्य शासनाने शंकरराव तोरस्कर यांच्या नावाची हुतात्मा म्हणून नोंद केली.

शंकरराव तोरस्कर हे पहिले बलिदान देणारे पश्चिम महाराष्ट्रातील ते एकमेव शिलेदार होते. १८ जानेवारी १९५६ रोजी बिंदू चौक येथे झालेल्या सभेत शंकरराव पोलिसांच्या गोळीने, बंदुकीच्या संगिनीने जखमी झाले. यातच त्यांचा सात दिवसांत मृत्यू झाला.

तशी ही घटना ५० वर्षांहून अधिक काळाची होती. तिचे पुरावे मिळवणे तसे कुटुंबीयांना अवघड काम होते. तरीही त्यांच्यासमवेत त्या वेळी असणारे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील, माजी आमदार बाबूराव धारवाडे, पहिलवान नारायण जाधव यांनी स्वत: येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जबाब नोंदवले. अखंड पाठपुराव्यानंतर अखेर शासनाने १०७वे हुतात्मा म्हणून असाधारण राजपत्रात त्यांची नोंद घेतली.