Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

92 टक्के प्रौढ भारतीयांकडे आधार कार्ड

 AADHAR

18 वर्षांवरील 92 टक्के व्यक्तींमध्ये आधार कार्ड असल्याने केंद्र व राज्यांच्या कल्याणकारी योजनांचा लाभ त्यांना मिळण्याची सोय झाली आहे. ‘युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया’ (यूआयडीएआय) चे हे मोठे यश मानले जात आहे. आधार कार्डमुळे इतर फायद्यांबरोबरच बँकांच्या आर्थिक स्रोताची गळती थांबली असून बनावट ओळख देण्याचे प्रकारही लक्षणीयरित्या कमी झाले आहेत. आधार कार्डांना ओळखपत्र म्हणून बँका वाढत्या प्रमाणात मान्यता देऊ लागल्या आहेत. केंद्राकडून साडेतीन लाख कोटीहून अधिक अनुदान दरवर्षी दिले जाते. 2009 पासून शासनाने या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी 7100 कोटी खर्च केले असून मिळणारे फायदे खर्चाहून अधिक आहेत. जागतिक बँकेनेही आधारकार्ड योजनेची प्रशंसा केली असून, त्यामुळे भ्रष्टाचाराच्या होणाऱया घटना कमी झाल्या असून शासनाच्या 1 अब्ज डॉलर्स (650 कोटी रुपये) एवढ्य़ा रकमेची बचत होत असल्याचे म्हटले आहे.