Whats new

प्रधानमंत्री यांनी केल्या नेताजींच्या गोपनीय फाइल्स सार्वजनिक

 BOSE

नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त त्यांच्याशी निगडित असलेल्या सर्व गोपनीय फाइलस सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. बोस कुटुंबीयांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या फाइल्स सार्वजनिक करण्यात आल्या. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी 24 ऑक्टोबर रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्या वेळी नेताजींच्या जीवनाशी संबंधीत सर्व गोपनीय फाइल्स सार्वजनिक करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, दिल्लीत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते या फाइल्स सार्वजनिक करण्यात आल्या. आता नेताजी बोस यांच्याशी निगडित अनेक बाबींचा उलगडा होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.