Whats new

शिवनारायण शिवनारायण चंद्रपॉलची क्रिकेटमधून निवृत्ती

 CHANDERPAUL

वेस्ट इंडीजचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. शिवनारायण चंद्रपॉलने आपल्या 22 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत 164 कसोटी आणि 268 एकदिवसीय सामन्यांत वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व केले आहे. तो वेस्ट इंडीजचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनविणारा दुसरा फलंदाज आहे. त्याने 11,867 धावा केल्या आहेत. तर, ब्रायन लाराच्या 11,953 धावा आहेत. त्याला लाराला मागे टाकण्यासाठी अवघ्या 86 धावांची गरज होती. पण, गेल्या अनेक महिन्यांपासून तो आंतरराष्ट्रीय संघातून बाहेर आहे. अखेर त्याने क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. चंद्रपॉलने आपला निवृत्तीचा निर्णय वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाला ई-मेल द्वारे कळवला आहे. वेस्ट इंडीज मंडळाचे अध्यक्ष डेव्ह कॅमरून यांनी त्याला भविष्यासाठी शूभेच्छा दिल्या आहेत.