Whats new

चीनमधील डॅलियन वांडा समूह भारतात उभारणार इंडस्ट्रियल पार्क

 CHINA

चीनमधील प्रख्यात डॅलियन वांडा उद्योगसमूहाने उत्तर भारतात (हरियाणा) औद्योगिक वसाहत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दहा अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असून, या समूहाचा भारतातील हा पहिला प्रकल्प आहे. हरियाणात १३ चौ. कि.मी. परिसरातील या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम या वर्षी सुरू होईल, असे कंपनीने सांगितले. हरियाणा सरकार वांडा यांना सर्वोच्च प्राधान्याने धोरणात्मक समर्थन देईल, असे कंपनीने म्हटले आहे. मनोरंजनापासून ते वित्तीय सेवांपर्यंत प्रकल्प आणि अधिग्रहणांवर डॅलियन वांडा आक्रमकपणे खर्च करत असून देशांतर्गत बांधकाम क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने त्यात संथपणा आला आहे. गेल्या वर्षी कंपनीने ४४ अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळवले आहे.