Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

डायल फॉर फूड बनली आयएसओ सर्टिफाईड कंपनी, नागपूरच्या नरेंद्र जोग यांची गरुडभरारी

 JOG

व्यवसाय उभा करण्यासाठी पैशांपेक्षा संकल्प आणि संकल्पना महत्त्वाच्या असतात, हे डायल फॉर फूड या अभिनव उपक्रमातून नरेंद्र जोग यांनी जगाला दाखवून दिले. एक रुपयाची गुंतवणूक न करता स्वतःच्या स्वयंपाकघरातून त्यांनी सुरू केलेल्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल तब्बल पाच कोटींच्या घरात आहे. विशेष म्हणजे हा सर्व व्यवहार ऑन रेकॉर्ड आहे. म्हणूनच जोग हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. ही आयएसओ सर्टिफाईड कंपनी ठरली आहे. सध्या जोगकडे शंभरपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. जोग यांची "गेस्ट हाउस‘ही आगळीवेगळी संकल्पना प्रवाशांच्या जीवनाला आरामदायी आणि आनंददायी बनवण्यास भर पडणारी आहे. नागपुरात कुठेही पाच रुपये प्रतिकिलोमीटर शुल्क घेऊन घरपोच सेवा दिली जाते. आजही एखादा पदार्थ अर्धा प्लेट मागवणा-याला नाही म्हटले जात नाही. अगदी दोन रसगुल्लेही हवे असतील, तरी पॅक करून घरपोच मिळू शकतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत जोग यांच्या व्यवसायाची नोंद आहे. .