Whats new

'पिफ'वर 'इममॉर्टल', 'तिथी' आणि 'रंगा पतंगा'ची मोहर

 PIFF

इराणमधील आजोबा-नातू यांच्या हळव्या नात्यावर आधारित इममॉर्टल या चित्रपटाने सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठीच्या प्रभात पुरस्कारावर नाव कोरले. या वेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील एकमेव भारतीय चित्रपट तिथीचे दिग्दर्शक राम रेड्डी यांना सर्वोत्तम दिग्दर्शनाकरिता असलेल्या प्रभात पुरस्काराने गौरवले. मराठी स्पर्धा विभागातून रंगा-पतंगा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी असणा-या संत तुकाराम पुरस्काराने सन्मानित केले. रंगा-पतंगाचे दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांनी सर्वोत्कृष्ट मराठी दिग्दर्शक ठरत आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

मराठी चित्रपटातील इतर बक्षिसे
• कौल चित्रपटास स्पेशल मेंशन सर्टिफिकेट
• हलाल चित्रपटास सर्वोत्तम पटकथा
• सर्वोत्तम अभिनेता : किशोर कदम, परतू या चित्रपटासाठी.
• सर्वोत्तम सिनेमेटोग्राफी : अजिथ रेड्डी, नटसम्राट चित्रपटासाठी.