Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to www.allauddin.co.in

Allauddin

देशातील सर्वात मोठा तिरंगा पर्रिकर यांच्या हस्ते फडकला

 national flag

देशातील सर्वात उंच खांबावर सर्वात मोठा राष्ट्रध्वज संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी फडकावला आहे. विशेष म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीला हा राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. ६६ फूट लांब व ९९ फूट रूंद असा राष्ट्रध्वज पर्रिकर यांनी २९३ फूट उंच खांबावर फडकावला. आतापर्यंतचा सर्वात मोठा ९६ फूट लांब व ६४ फूट रूंद राष्ट्रध्वज फरिदाबाद येथे २५० फूट उंचीच्या खांबावर गेल्यावर्षी फडकावण्यात आला होता. पहारी मंदिर येथे ध्वज फडकावल्यानंतर बिरसा मुंडा येथील स्टेडियमवर मुलांसमोर बोलताना पर्रिकर यांनी सांगितले की, झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्यामुळे आपल्याला हा ध्वज फडकावण्याची संधी मिळाली. पर्रिकर यांनी यावेळी रक्षा शक्ती विद्यापीठाची कोनशिलाही ऑनलाईन बसवली, आजच्या सायबर युद्धाच्या काळात बुद्धिमत्ता व शक्तिसामथ्र्य या दोन्हींना महत्त्व आहे असे सांगून ते म्हणाले की, गुजरात, राजस्थान यांच्यानंतर झारखंड हे रक्षा शक्ती विद्यापीठ असणारे तिसरे राज्य ठरले आहे.