Whats new

पी.व्ही.सिंधूने पटकावले मलेशियन ओपनचे जेतेपद

 P V SINDHU

भारताची हरहुन्नरी बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधूने मलेशिया मास्टर्स ग्रां पी सुवर्ण बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. या वर्षातील पहिले विजेतेपद मिळविताना सिंधूने अंतिम फेरीत किर्से ग्लिमोरचा 21-15, 21-9 असा सहज पराभव केला.

सिंधूने उपांत्य फेरीत अव्वल मानांकित कोरियाच्या जि ह्यून सुंगचा चुरशीच्या सामन्यात पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती. तिने अंतिम फेरीतही आपली लय काम ठेवत ग्लिमोरला संधी दिली नाही. पहिल्या गेममध्ये गिलमोरने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण, दुसऱ्या गेममध्ये सिंधूने तिला कोणतीच संधी न देता 21-9 असा गेम जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत दोनदा ब्रॉंझपदकाची कमाई करणारी सिंधू जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानी आहे. या विजयामुळे सिंधूचे ग्रांपी सुवर्ण स्पर्धेतील हे पाचवे विजेतेपद ठरले आहे. या अगोदर तिने मलेशियातील ही स्पर्धा 2013 मध्ये जिंकली होती, तर मकाऊ स्पर्धेत 2013 ते 15 अशी हॅटट्रिक केली आहे.