Whats new

बिग बॉस ९ चा विजेता ठरला प्रिन्स नरूला

 PRINCE NARULA

कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस-9’ डबल ट्रबलचा विजेता प्रिन्स नरूला ठरला आहे. प्रिन्सने मंदना करिमी व ऋषभ सिन्हा या स्पर्धकांना हरवत नवव्या पर्वाचे विजेतेपद पटकावले. ‘बिग बॉस’चा अंतिम सोहळा लोणावळा येथे झाला. या वेळी ‘बिग बॉस’चा होस्ट अभिनेता सलमान खान व ‘फितूर’ चित्रपटातील कलाकार अभिनेत्री कतरिना कैफ व आदित्य रॉय कपूर उपस्थित होते. प्रिन्स नरूला हा एक मॉडेल असून, त्याने एम टीव्हीचे शो ‘रोडीज एक्स टू’ आणि ‘स्प्लिट्स व्हिला 8’चे विजेतेपद पटकावले आहे. तो 2014 मध्ये प्रिन्स मिस्टर पंजाब स्पर्धेत सेकंड रनर अप ठरला होता. या स्पर्धेत ऋषभ सिन्हा रनरअप ठरला आहे. ऋषभ हा छोट्या पडद्यावरील कलाकार असून, त्याने झी वाहिनीवरील ‘कबूल है’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्याने बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्डने एन्ट्री केली होती. बिग बॉसच्या नवव्या पर्वाच्या अंतिम सोहळ्यात सलमान खान व कतरिना कैफ यांच्यासह अनेक कलाकारांनी परफॉर्मन्स सादर केले. बिग बॉस ९चे विजेतेपद खिशात टाकणारा प्रिन्स नरूला एक मॉडेल असून, त्याने यापूर्वी अशाप्रकारच्या अनेक शोमध्ये हजेरी लावली आहे.