Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to www.allauddin.co.in

Allauddin

नागपूर येथील दीक्षाभूमीसाठी नऊ कोटी रुपये मंजूर, जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जासाठी मास्टर प्लॅनबाबत नासुप्रला आदेश

DIKSHA

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत येणा-या डॉ आंबेडकर फौंडेशन या स्वायत्त मंडळाने नागपूर येथील दीक्षाभूमीच्या विकासाकरिता महाराष्ट्र सरकारला नऊ कोटी रुपये मंजूर केले आहेत. केंद्र सरकार डॉ. आंबेडकरांची १२५ वे जयंती वर्ष साजरे करीत आहे. ‘डॉ. आंबेडकरांनी १४ आक्टोबर १९५६ रोजी आपल्या अनुयायांसमवेत धर्मांतर केलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमीच्या विकासासाठी येणा-या ९,४१,३९,२७६ रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. दीक्षाभूमी येथे डॉ. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती समारोहासंदर्भात होणा-या विकासकामांसाठी मंजूर रकमेच्या ५० टक्के म्हणजे ४,७०,६९,६३८ रुपये नागपूर जिल्हाधिका-यांना जारी करण्यात आली आहे, तर उर्वरित रक्कम विकासकामातील प्रगतीच्या आधारावर जारी केली जाईल, असे एका सरकारी आदेशात म्हटले आहे. दीक्षाभूमीला जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीसाठी मास्टर प्लान तयार करण्याचे नागपूर सुधार प्रन्यासला सांगितले आहे. .