Whats new

महिला पोलिसांसाठी ठाण्यात सॅनिटरी नॅपकिन वेन्डिंग मशिन

SANITARY

मासिक पाळीदरम्यान महिला पोलिसांची होणारी कुचंबणा टाळण्यासाठी ठाणे पोलिस मुख्यालयात व वाहतूक नियंत्रण शाखेत सॅनिटरी नॅपकिन वेन्डिंग मशिन नुकतीच बसवण्यात आली. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी डीसीपी रश्मी करंदीकर यांच्यासह पोलिस दलातील कर्मचारी उपस्थित होते. काय व कसे चालते सॅनिटरी नॅपकिन मशिन • एचएलएल या कंपनीचे हे मशिन असून बॅंकेच्या एटीएमप्रमाणे हे मशिन कार्य करते. • तुम्ही या मशिनमध्ये 10 रूपये टाकताच सॅनिटरी नॅपकिन पॅड बाहेर येईल. • ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांच्या पुढाकाराने आणि नगरसेविका पूजा वाघ यांच्या अर्थसाहाय्यातून दोन सॅनिटरी नॅपकिन व्हेण्डिंग मशीन उपलब्ध • यातील एक मिशन ठाणे पोलिस मुख्यालयात तर दुसरे मशिन वाहतूक नियंत्रण कक्षात • या दोन मशिनमुळे ठाणे पोलिस दलात कार्यरत असलेल्या 600 हून अधिक महिला पोलिस कर्मचा-यांना फायदा होणार आहे.