Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

चहावाला सोमनाथ बनला कमवा व शिका योजनेचा ब्रँड अॅ-म्बेसिडर!

TEA

चहाची टपरी चालवून चार्टड अकाउटंट (सी ए) ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सोमनाथ गिरम याची राज्य शासनाच्या कमवा व शिका योजनेचा ब्रँड अॅतम्बेसिडर करण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. त्यामुळे आजवर स्वत:च्या कमाईवर शिक्षण पूर्ण करणारा सोमनाथ आता इतर विद्यार्थ्यांनाही धडे देणार आहे. डीएसके इंटरनॅशनल कॅम्पस - रुबिकाच्या पदवी प्रदान समारंभात तावडे यांच्या हस्ते सोमनाथचा सत्कार करण्यात आला. सोमनाथ सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सांगवी गावचा. जिरायती शेती. पाऊसच पडत नसल्याने पीकही नाही. त्यामुळे आई-वडील दुस-यांच्या शेतात मजुरी करत घरचा गाडा चालवतात. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर खर्च करणे अशक्यच. दररोज ३२ किमी अंतर सायकलवर कापत जेऊर येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. उच्चपदवीच्या शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर घरातून पैसे येणे शक्य नव्हते. म्हणून त्याने पेरूगेट पोलीस चौकीच्या परिसरात चहाची टपरी टाकली. दिवसभर चहा विकून आणि रात्रभर अभ्यास करून सोमनाथने सीएची अंतिम परीक्षा दिली आणि त्यात तो उत्तीर्ण झाला.