Whats new

प्रभात रंजन यांना पहिला द्वारकाप्रसाद अग्रवाल पुरस्कार

PRABHAT RANJAN

द्वारकाप्रसाद अग्रवाल पुरस्कार हिंदीतील तरुण साहित्यकार प्रभात रंजन यांना त्यांच्या कोठागाई या पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलदरम्यान हॉटेल फ्रंट लोनमध्ये हा सोहळा पार पडला. या पुरस्काराचा उद्देश हिंदी भाषेला नवी ओळख देण्यासोबतच हिंदी साहित्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देणे, हा आहे. आता द्वारकाप्रसाद अग्रवाल पुरस्कारही दरवर्षी प्रदान करण्यात येणार आहे. हिंदीला प्रोत्साहन देण्यासाठी हिंदी लेखन स्पर्धा दरवर्षी लिटरेचर फेस्टिव्हलदरम्यान घेतली जाते. या स्पर्धेतील विजेत्यांना दरवर्षी जगभरातील दिग्गज साहित्यिक, लेखकांना भेटण्याची, त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. उल्लेखनीय बाब अशी, की प्रभात रंजन हे तरुण साहित्यिक आहेत. त्यांचे पुस्तक कोठागाई हिंदीतील सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एक आहे. त्याशिवाय त्यांच्या जानकी पूल, बोलेरो क्लास ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते दिल्लीच्या झाकीर हुसेन नाइट महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांना २००६ मध्ये प्रेमचंद पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.