Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्र, तर लान्सनायक मोहननाथ गोस्वामी यांना मरणोत्तर अशोक चक्र

SANTOSH

काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्यचक्र जाहीर करण्यात आले. लष्करी सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणा-या जवानांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. कुपवाडा जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हाजी नाका परिसरातील दाट जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. महाडिक हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी गावचे रहिवासी आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात दाट जंगलाच्या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. तिचे नेतृत्व कर्नल संतोष महाडिक करीत होते. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र, तेथे त्यांना वीरगती प्राप्त झाली. महाडिक यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात झाले. १९९८ मध्ये ते लष्करात विशेष दलात दाखल झाले. अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना याआधी सेना पदकाने गौरवण्यात आले होते. लान्सनायक मोहननाथ गोस्वामी यांना मरणोत्तर अशोक चक्र, सुभेदार मोहनसिंह व शिपाई जगदीश चांद (मरणोत्तर) यांना कीर्ती चक्र सन्मान मिळेल. मेजर अनुरागकुमार, नाईक सतीशकुमार (मरणोत्तर), शिपाई धर्माराम यांना (मरणोत्तर) शौर्य पुरस्कार जाहीर झाला.