Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

जपानच्या सॉफ्टबँकेने हाऊसिंग डॉट कॉममध्ये केली आहे तब्बल 100 कोटी रुपयांची गुंतवणूक

 SOFT BANK

जपानच्या सॉफ्टबँकने रियल्टी लिस्टिंग पोर्टल हाऊसिंग डॉट कॉममध्ये 100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. भारतामध्ये विकासाच्या प्रकियेमध्ये मोठी सुधारणा होत असून, येणा-या काही वर्षांमध्ये कंपनी भारतातील आपले गुंतवणूक वाढवून 10 अब्ज डॉलर्सपर्यंत नेणार आहे, अशी माहिती सॉफ्टबँकचे अध्यक्ष मासायोशी सोन यांनी दिली आहे. सॉफ्टबँकची हिस्सेदारी हाऊसिंग डॉट कॉममध्ये 30 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या नवीन गुंतवणुकीमुळे यामधील हिस्सेदारी कितीने वाढली, याची माहिती कंपनीने अद्याप उपलब्ध केलेली नाही.

स्नेहिल बुक्सी यांची प्रमुख उत्पादन अधिकारीपदी निवड
हाऊसिंग डॉट कॉमने स्नेहिल बुक्सीला प्रमुख उत्पादन अधिकारी म्हणून निवडले आहे. स्नेहिल आयआयटी मुंबईमधून पासआऊट असून, तो हाऊसिंग डॉट कॉमचा संस्थापक-सदस्य आहे. स्नेहिलने हाऊसिंग डॉट कॉमचे डिझाइन तयार करण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. 2012 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या हाऊसिंग डॉट कॉमवर महिन्याला 80 लाख हिट येतात. तसेच जवळपास 10 लाख प्रॉपर्टी लिस्टेड आहे. कंपनीने 10 कोटी डॉलर सॉफ्ट बँक, नेक्सस व्हेंचर, फाल्कन एज, हेलिन व्हेंचर यांच्या माध्यमातून जमा केले आहेत.