Whats new

व्हेनेज्युएलामध्ये पेट्रोल मिळतेय फक्त १ रुपया ३६ पैशांत

VENEZUELA

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या दरात झपाट्याने कपात होत आहे. त्यात व्हेनेज्युएला हा क्रूड ऑइल एक्सपोर्ट करणारा देश आहे. व्हेनेज्युएलामध्ये जनतेला पेट्रोलवर सर्वांत जास्त अनुदान (सबसिडी) मिळते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे (क्रूड ऑइल) दरात कमालीची घट आल्यामुळे व्हेनेज्युएलामध्ये पेट्रोलचे दर 1 रुपया 36 पैसे प्रतिलिटरवर आले आहे. भारताची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 59 रुपये 99 पैसे प्रतिलिटर आहे, तर शेजारी असलेल्या पाकिस्तानात पेट्रोल प्रतिलिटर 49 रुपये 47 पैसे या दराने विक्री होत आहे.