Whats new

राधाकृष्ण विखेंच्या पुतणी बनल्या स्वीडिश पंतप्रधानांच्या सल्लागार

 VIKHE

नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागारपदी नियुक्ती झाली. 30 वर्षीय नीला या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यांची नात व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. अशोक विखे पाटील यांची कन्या आहेत, तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंच्या पुतणी आहेत. स्वीडनमध्ये जन्मलेल्या नीलाने आपल्या बालपणाचा काही काळ अहमदनगरमध्ये घालवला आहे. तिने गोटेनबर्ग बिझनेस महाविद्यालयातून अर्थशास्त्र व कायदा या विषयात पदवी घेतली. त्यानंतर माद्रिद (स्पेन) विद्यापीठातून एमबीए केले. पदवी शिक्षणात संघटनात्मक व्यवस्थापन तर पदव्युत्तर शिक्षणात आर्थिक व्यवस्थापन, लेखा, व्यापार कायदा या विषयात विशेष शिक्षण घेतले आहे. स्टॉकहोम महानगरपालिका निवडणुकीत समिती सदस्य व स्टॉकहोम जिल्हा न्यायालयात ज्युरी म्हणून नीलाने काम केले आहे. विद्यार्थिदशेत नीला हिने स्वीडनमधील ग्रीन पार्टी, स्वीडीश यंग ग्रीन्समध्ये काम केल्याचा तिला फायदा झाला.