Whats new

ईएमआयवर मिळणार एलपीजी कनेक्शन - पेट्रोलियम मंत्र्यांची घोषणा

 GAS

एलपीजी कनेक्शन घेणे आता आणखी सुलभ होणार आहे. पेट्रोलियम मंत्रालय प्रत्येक महिन्याच्या हप्त्यावर म्हणजे ईएमआयवर गॅस कनेक्शन देण्याची तयारी करत आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही घोषणा केली आहे. सरकार सध्या पुढील तीन वर्षांमध्ये 10 कोटी नवीन कनेक्शन देण्याच्या योजनेवर काम करत आहे. या योजनेमुळे अनेकांच्या घरात एलपीजी गॅस कनेक्शन उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

नवीन एलपीजी कनेक्शनची किंमत 3,400 रुपये आहे. हे कनेक्शन ईएमआयवर उपलब्ध करण्यात येणार आहे. इएमआय 24 महिन्यांसाठी असणार आहे. पेट्रोलियम मंत्रालय यासाठी बँकांसोबत चर्चा करत आहे. आतापर्यंत फक्त ग्राहकोपयोगी उत्पादनांसाठी ईएमआय देण्यात येत होता. ही योजना सुरू करण्यात आल्यानंतर अनेक लोकांना गॅसची सुविधा घेण्यास प्रोत्साहन मिळेल, असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. सध्या देशात 16.5 कोटी एलपीजी कनेक्शन आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाने डिसेंबर 2018 पर्यंत 10 कोटी नवीन कनेक्शन जोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे.