Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

रवींद्र कदम यांना राष्ट्रपती पोलिस पदक, तर एस. बी. देव यांना अतिविशिष्ट सेवा पदक

 MAHARASHTRA POLICE

नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पोलिसपदक जाहीर करण्यात आले. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पोलिस विभागात उल्लेखनीय कामगिरी करणा-या पोलिस अधिका-यांना तसेच कर्मचा-यांना राष्ट्रपती पोलिस पदक, विशेष पोलिस पदक आणि अन्य पुरस्काराने शासनाच्या वतीने सन्मानित केले जाते. यावर्षी कदम यांना राष्ट्रपती पोलिस पदक घोषित झाले. कदम हे १९८३ मध्ये पोलिस उपअधीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलिस दलात दाखल झाले. त्यांनी विविध ठिकाणी काम केले. नागपूर येथे पोलिस उपायुक्तम, अप्पर पोलिस आयुक्ता म्हणून काम केले. चंद्रपूर येथे पोलिस अधीक्षक म्हणून उत्कृष्टपणे काम केले. पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांच्याकडे गडचिरोली या नक्षल प्रभावित जिल्ह्याचा कारभार सोपवण्यात आला. नक्षल क्षेत्रात काम करताना त्यांनी महत्त्वाच्या कामगिरी केल्या. फेब्रुवारी २०१४ मध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून पदोन्नती दिल्यानंतर त्यांची नागपूर परिक्षेत्रात नेमणूक करण्यात आली. सोबतच त्यांच्याकडे गडचिरोलीचा अतिरिक्तद कार्यभार सोपविण्यात आला. नक्षली समर्थक प्रा. साईबाबा प्रकरणात त्यांनी तपास अधिका-यांना योग्य ते मार्गदर्शन केले.

एस. बी. देव यांना अतिविशिष्ट सेवापदक
एअर मार्शल एस. बी. देव यांना राष्ट्रपतींद्वारे देण्यात येणारे अतिविशिष्ट सेवापदक जाहीर करण्यात आले आहे. एअर मार्शल देव फायटर कॉम्बॅट लीडर आणि ए-२ पात्रता प्राप्त फ्लाइंग इन्स्ट्रक्टरर आहेत. मूळ नागपूरकर असलेले देव वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. एअर मार्शल देव यांनी १५ स्क्वॉड्रन आणि मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून कार्य केले आहे. त्यांनी आजवरच्या सेवेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्या. यामध्ये, स्टेशन कमांडर, हवाई कारवायांचे महासंचालक म्हणून विशेष कामगिरी केली आहे. वायुभवन या मुख्यालयीदेखील त्यांनी आपली सेवा दिली.

भास्कर वानखडेंना पोलिस गुणवत्ता पदक
नागपूर पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक भास्कर रामराव वानखडे यांना पोलिस गुणवत्ता पदक घोषित करण्यात आले. ते सध्या विशेष शाखेत कार्यरत आहेत. सहायक फौजदार हे नागपूरच्या विशेष शाखेत कार्यरत आहेत. वानखडे हे १९७८ मध्ये शहर पोलिस दलात भरती झाले. त्यांनी पाचपावली, मुख्यालय, गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, धंतोली, वाडी, लकडगंज आणि अजनी येथे उत्कृष्टपणे काम केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. नक्षलग्रस्त भागात समाधानकारक सेवा बजावल्याबद्दल जिल्ह्यातील ११ पोलिस अधिका-यांना पोलिस महासंचालकांच्या विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

विशेष सेवा पदक विजेते
दहिवडीचे पोलिस उपअधीक्षक यशवंत काळे, साता-याचे पोलिस उपअधीक्षक खंडेराव धरणे, मेढ्याचे सहायक निरीक्षक समाधान चवरे, ढेबेवाडीचे सहायक निरीक्षक लिंगय्या चौखंडे, सातारा तालुक्याकचे सहायक निरीक्षक सुनील जाधव, क-हाड तालुक्याकचे सहायक निरीक्षक स्वप्नील लोखंडे, फलटण शहरचे सहायक निरीक्षक सोमनाथ लांडे, उंब्रजचे सहायक निरीक्षक मालोजी देशमुख, औंधचे उपनिरीक्षक दिगंबर अतिग्रे, सातारा तालुक्या चे उपनिरीक्षक चेतन मछले व वडूजचे उपनिरीक्षक दुर्गनाथ साळी. साता-यात नेमणूक होण्यापूर्वी या अधिका-यांनी गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागात दोन वर्षे समाधानकारक सेवा बजावल्यामुळे त्यांना हे पदक जाहीर झाले आहे.