Whats new

स्थलांतरितांमध्ये भारत जगात अव्वल

 NRI

देशाबाहेर स्थलांतर करणा-यांच्या यादीत भारताने रशियाला मागे टाकत जगात पहिला क्रमांक पटकावला आहे. सध्या भारतातील 1 कोटी 60 नागरिकांनी परदेशात स्थलांतर केले आहे. 2000 ते 2015 या 15 वर्षांच्या कालावधीत स्थलांतरणाच्या यादीत भारताने रशियाला मागे टाकून जगात अव्वल स्थान पटकावले. भारतानंतर 1 कोटी 12 लाख नागरिकांसह मॅक्सिको व 1 कोटी 10 लाख नागरिकांसह रशिया अनुक्रमे दुस-या व तिस-या स्थानावर आहे. त्यानंतर चीन ( 1 कोटी), बांगलादेश (70 लाख) आणि पाकिस्तान (60 लाख) या देशांचा क्रमांक लागतो. भारतातून परदेशात स्थलांतर करणाऱया नागरिकांची पहिली पसंती सौदी अरेबियाला असल्याचेही एका आकडेवारीवरून समोर आली आहे. सौदीत जवळपास 30 लाख भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. त्याचबरोबर गेल्या 15 वर्षांच्या कालावधीत भारतातून अमेरिकेत स्थलांतर करणा-यांच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाली आहे.