Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

शेतक-याने तयार केली बंब कम स्वयंपाक, इंधनात होणार वीस ते पंचवीस टक्के बचत, लवकरच मिळणार पेटंट

 PATENT

पारंपरिक चुलीमध्ये अंतर्गत बदल करून इंधनात वीस ते पंचवीस टक्के बचत करून प्रदूषणात लक्षणीय घट करणारी नवी चूल निर्माण करण्यात आली आहे. वाया जाणा-या ऊर्जेचा वापर पाणी गरम करण्यासाठी केला जातो. एकाच वेळी स्वयंपाक तसेच बंबाचे काम करणा-या या चुलीला लवकरच पेटंट मिळणार आहे. अवघ्या तिसरीपर्यंत शिक्षण झालेल्या सिन्नरच्या कहांडळवाडी येथील नवनाथ पवार या शेतक-याने ही चूल तयार केली आहे. पर्यावरणपूरक आणि कमी खर्चात जास्त कार्यक्षमता असलेली ही चूल ग्रामीण भागातील पारंपरिक मातीच्या चुलीत बदल करून बंदिस्त स्वरूपातील शेगडीप्रमाणे तिची रचना आहे. त्यात लाकूडफाटा तसेच शेणाच्या गोव-यांचाच वापर केला जाईल. मात्र, पारंपरिक चुलीत हवेचा गरजेनुसार तसेच पुरेसा पर्यायी इंधन म्हणून वापर करण्यात आला आहे. याशिवाय इंधन पूर्णतः वापरले जाऊन, हवेत मिसळणा-या ऊर्जेचा गरम पाण्यासाठी उपयोग केला आहे. त्यासाठी त्यात खालच्या बाजूने एक पाइप आहे. त्यात थंड पाणी गेल्यावर ते गरम होऊन हलके होत असल्याने वरच्या बाजूला बसवलेल्या पाइपद्वारे बाहेर येईल. ते टाकीला जोडून सोलरच्या तंत्राप्रमाणेच ते टाकीत साठवले जाईल. त्याचा अंघोळीसाठी वापर करता येईल.

सामान्यतः वापरल्या जाणा-या चुलीत 60 ते 65 टक्केच कार्यक्षमता वापरली जाते व उर्वरित ऊर्जा हवेत जाते. शिवाय त्यामुळे कार्बनडाय ऑक्सालइड तसेच सल्फर हवेत मिसळून प्रदूषण होते. इंधन अर्धवट जळत असल्याने कार्बनडाय ऑक्साकइड व सल्फर जास्त प्रमाणात उत्सर्जित होते. शिवाय, पाणी गरम करण्यासाठीही अतिरिक्त ऊर्जा वापरली जाते. साधारणतः साठ ते पासष्ट टक्के कार्यक्षमता या पारंपरिक चुलीत आहे. त्यातून उर्वरित ऊर्जा रेडिएशनच्या रूपाने वातावरणात मिसळून वाया जाते. या उणिवांवर नव्या चुलीची मात्रा असून त्याने स्वयंपाक करता करता बंबाचेही काम होईल. भारताच्या ग्रामीण भागासह झिंबाब्वे, आफ्रिका अशा विविध देशांमध्ये स्वयंपाकासाठी चुलीचा वापर केला जातो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड होते. एका अंदाजानुसार, दरवर्षी आठ ते दहा कोटी झाडांची त्यासाठी तोड केली जाते. या चुलीचा शंभर टक्के वापर सुरू झाल्यास इंधनाची बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होऊ शकेल. जागतिक हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे निर्माण होणा-या समस्येवर हा चांगला पर्याय ठरू शकेल, असा विश्वाबस पवार यांनी व्यक्त केला आहे.

सहा पेटंट मिळवणा-या मुलापासून त्यांनी घेतली प्रेरणा
सामान्यतः मुलगा वडिलांपासून प्रेरणा घेत असल्याचे चित्र पाहायला मिळते. येथे मात्र चक्र उलटे फिरल्याचे दिसते. नवनाथ पवार यांचे अवघ्या तिसरीपर्यंत शिक्षण झालेले आहे. त्यांचा मुलगा राजेंद्र पवार मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन त्याने बी.टेक. केले आहे. ऑटोमोबाइल एनर्जी, सिंचन आदींविषयांशी निगडित सहा पेटंट त्याच्या नावे जमा आहेत. त्यामुळे मुलाच्या कामापासून प्रेरणा घेऊनच आपणही काही तरी नवे करावे, या हेतूने ही चूल विकसित केल्याचे त्यांनी सांगितले.