Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

17 राखीव बटालियन बनवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

 COMMONDO

दहशतवाद आणि नक्षल प्रभावित राज्यांमध्ये शांती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 17 नव्या राखीव बटालियन बनवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, जम्मू-काश्मीर आणि इतर नक्षल प्रभावित राज्यांमध्ये मोहिमेची जबाबदारी याच बटालियनची असेल. प्रत्येक बटालियनमध्ये 1000 जवान असतात, या दृष्टीने पाहिल्यास 17,000 नव्या जवानांची भरती होईल. दीर्घ काळापासून होणा-या या मागणीला मंजुरी देताना मंत्रिमंडळाच्या निर्णयात सर्व 17 बटालियनमध्ये युवांची भरती होईल आणि त्यांना संधी दिली जाईल, असे म्हटले गेले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये एकीकडे दहशतवादाची समस्या आहे तर ईशान्येच्या राज्यांमध्ये उग्रवाद्यांच्या कारवाया सुरू आहेत, तर मध्य भारतातील काही राज्यांमध्ये नक्षलवादाच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे.