Whats new

भारतीय वंशाच्या तीन डॉक्टरांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च पुरस्कार

 DOCTOR

भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी आणि चिकित्सक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी भारतीय वंशाच्या तीन व्यक्तींना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरिक सन्मान प्रदान करण्यात आला. कॅनबेरास्थित ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय विश्वविद्यालय (एएनयू)चे प्रतिष्ठित प्राध्यापक चेन्नुपति जगदीश, न्यू साउथ वेल्समध्ये नेत्र चिकित्सक जय चंद्रा आणि मेलबर्नचे एक दंत चिकित्सक संजीव कोशी यांना 2016 चा ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ पुरस्कार देण्यात आला.चेन्नुपति जगदीश यांना हा पुरस्कार भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबाबत देण्यात आला. त्यांची ‘कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’साठी निवड करण्यात आली. ‘वेस्टमेड’ रुग्णालयाचे नेत्र चिकित्सक जय चंद्रा यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत गौरवण्यात आले. मेलबर्नमध्ये राहणारे कोशी यांना दंत चिकित्सा क्षेत्रात त्यांच्या अभूतपूर्व कार्याबाबत सन्मानित करण्यात आले.