Whats new

राजपथावरील महाराष्ट्राच्या सोंगी मुखवटा नृत्याला प्रथम क्रमांक

 MAHARASHTRA

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतल्या राजपथावर नाशिकच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या महाराष्ट्राच्या नृत्याचा गौरव करण्यात आला आहे. सोंगी मुखवटे या नृत्याला बाल विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे. या नृत्यामध्ये नाशिकच्या 20 शाळेतील 150 विद्यार्थी सहभागी झाले होते. चैत्र पौर्णिमेला देवीच्या पूजेच्यावेळी सोंगी मुखवटे हा नृत्य प्रकार आदिवासी जिल्ह्यात सादर केला जातो. साधारणत: होळीनंतर हा नृत्यप्रकार सादर केला जातो. हातामध्ये काठी घेऊन हे नृत्य सादर केले जाते. ढोल, संबल आणि पावरी वाद्याचा यात वापर केला जातो. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे यापूर्वी सादर झालेल्या या नृत्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालचा चित्ररथ यंदाच्या संचलनात सर्वोत्कृष्ट ठरला आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला होता, मात्र रोटेशन पद्धतीनुसार यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी झाला नव्हता.