Whats new

55 व्या महाराष्ट्र राज्य अंतिम हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धेत ‘असूरवेद’ची सरशी

 NATAK

55 व्या महाराष्ट्र राज्य अंतिम हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई या संस्थेच्या ‘असूरवेद’ या नाटकासाठी 3 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली आहे. अक्टिव्ह ग्रुप, सांगली या संस्थेच्या वृंदावन या नाटकास 2 लाख रुपयांचे द्वितीय पारितोषिक आणि मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव या संस्थेच्या ‘नाना भोळे- 12 शनिपेठ’ या नाटकासाठी 1 लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या 55व्या राज्य हौशी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत राज्यातील 18 आणि गोव्याचे एक अशा एकूण 19 नाटकांचे सादरीकरण झाले. हौशी रंगकर्मींना हक्काचा रंगमंच उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा गेल्या 55 वर्षांपासून घेण्यात येते. राज्यभरात वेगवेगळ्या केंद्रांवर झालेल्या प्राथमिक फेरीतून 355 नाटकांमधून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या 19 नाटकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली. दिग्दर्शन : प्रथम - सुनील हरिश्चंद्र (असूरवेद), द्वितीय दयानंद नाईक (वृंदावन), तृतीय - हेमंत कुलकर्णी (नाना भोळे 12 शनिपेठ), उत्कृष्ट अभिनय पुरुष कलाकार आरावसू (नाटक अग्नीचे पाऊस पाण्याचे), नाना (नाना भोळे 12 शनिपेठ), विनोद राऊत (तीस तेरा), श्रीकांत भिडे (अंधाराचे बेट), वैजनाथ गमे (गोडसे अट गांधी डॉट कॉम), किशोर पुराणिक (खंडहर), सुशील इनामदार (असूरवेद), संतोष साळुंखे (मुक्ती), मिलिंद भणगे (याही वळणावर), ओमकार पाटील (मेन विदाऊट शॅडोज) स्त्री कलाकार : किरण पावसे (नाटक अग्नीचे पाऊस पाण्याचे), नूतन धवने (ज्याचा त्याचा प्रश्न), सोनल आव्हाड (बेबी), अपूर्वा कुलकर्णी (नाना भोळे 12 शनिपेठ), सोनल शिंदे (धुआँ), मफणाल वरणकर (असूरवेद), संस्कृती रांगणेकर (बळी), वैभवी सबनीस (मुक्ती), कविता गडकरी (वृंदावन), धनश्री गाडगीळ (वृंदावन) यांना विजेते म्हणून घोषित करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दत्ता भगत, बाबा पार्सेकर, विजयकुमार नाईक, अनिल गवस आणि सुरेंद्र केतकर यांनी काम पाहिले तर मंदार काणे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.