Whats new

नेमबाजपटू हीना सिधू ऑलिम्पिकसाठी पात्र, स्थान निश्चित करणारी नववी नेमबाजपटू

 SIDHU

भारताची दिग्गज नेमबाजपटू हीना सिधूने आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावून रिओ ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित केला. रिओ ऑलिम्पिकमध्ये स्थान निश्चित करणारी ती नववी नेमबाजपटू ठरली आहे. चायनीज तैपेईच्या टिएन चिआ चेनने १९८.१ गुणांसह रौप्य आणि कोरियाच्या गिम यून मी हिने १७७.९ गुणांसह कांस्यपदक जिंकले.

५० मीटर रायफल प्रोन आणि महिलांच्या ट्रॅप प्रकारात एकाही भारतीय नेमबाजपटूला पात्रता फेरीची वेस ओलांडता आली नाही. पुरुष रायफल प्रोन प्रकारात युवा स्वप्निल कुसळेला (६१७.२) १४ व्या, सुशील घाळेला १७ व्या आणि सुरेंद्र सिंग राठोडला २४ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. महिलांच्या ट्रॅप प्रकारात पराभव पत्करावा लागल्याने भारताच्या श्रेयसी सिंगची ही संधी हुकली. २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारातील पहिल्या फेरीत लंडन ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेत्या विजय कुमारने (२८५) सातवे स्थान पटकावले. याव्यतिरिक्त नीरज कुमार आणि हरप्रीत सिंग यांनी अनुक्रमे १३ वे व १६ वे आणि महिलांच्या एअर पिस्तूल प्रकारात यशस्विनी देशवल आणि श्वेता सिंग यांनी अनुक्रमे ११वे व १२ वे स्थान पटकावले.