Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

महाराष्ट्रात हेल्मेट सक्ती लागू, दिवाकर रावते यांची घोषणा

  helmet

 

नवीन वर्षापासून राज्यातील वाहतूक नियम अधिक कडक करण्याचा निर्णय परिवहन खात्याने घेतला असून, आता संपूर्ण राज्यात हेल्मेट सक्ती लागू करण्यात आल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच केली. त्याचप्रमाणे मद्यपी तसेच मोबाइलवर बोलणा-या वाहनचालकांविरोधात कारवाईचा फास अधिक आवळण्यात आला असून, त्यांना पोलिस कारवाईबरोबरच आता तीन महिन्यांसाठी परवानाच गमवावा लागणार आहे. हेल्मेट सक्ती आता केवळ मुंबईपुरती नाही, तर संपूर्ण राज्यात लागू झाली आहे.

सीटबेल्टबाबतचे नियमही राज्यभर लागू राहतील. हेल्मेट आणि सीटबेल्टचे नियम न पाळणा-यांना आता आरटीओ कार्यालयात समुपदेशनासाठी किमान २ तास उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई शहरात सीसी टीव्ही कॅमे-यांचे जाळे कार्यान्वित झाल्याने वाहतुकीचे नियम न पाळता वाहने चालवणा-यांचे गुन्हे आता सीसी कॅमे-यात बंदिस्त होणार आहेत.

...तर ३ महिने परवाना रद्द

१) अधिक वेगाने वाहन चालवल्यास

२) सिग्नल तोडल्यास

३) मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक केल्यास

४) मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक केल्यास

५) मद्यपान करून वाहन चालवल्यास

६) वाहन चालवताना मोबाइल फोनचा वापर केल्यास