Whats new

उत्तर प्रदेशच्या पोलिस महासंचालकपदी एस. जावेद अहमद नियुक्त

javed

 

उत्तर प्रदेशच्या पोलिस महासंचालकपदी एस. जावेद अहमद यांची नियुक्ती झाली आहे. पोलिस महासंचालक जगमोहन यादव हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी अहमद यांची नियुक्ती झाली. अहमद हे भारतीय पोलिस सेवेतील 1984 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. ते यापूर्वी रेल्वेचे उपसरव्यवस्थापक होते. आता त्यांची पोलिस महासंचालकपदी निवड झाल्याचे राज्याच्या गृह विभागाचे मुख्य सचिव दिव्यांश पांडा यांनी सांगितले. फौजदार, पोलिस निरीक्षक व वरिष्ठ अधिका-यांच्या मदतीने पोलिस दलात विश्‍वासाचे नाते निर्माण करून राज्यासाठी चांगले काम करण्याची ऊर्मी त्यांच्यात जागवू, असा विश्वास अहमद यांनी नियुक्तीनंतर व्यक्त केला.