Whats new

इंग्लंडमधील नव्या नाण्यांवर झळकणार शेक्सपिअरची कथानके

shakespeare

 

२०१६ मध्ये इंग्लंडमध्ये आणल्या जाणा-या नव्या नाण्यांवर प्रख्यात साहित्यिक, नाटककार शेक्सपिअर याची नाटके आणि बीट्रिक्स पॉटरच्या परिकथांची चित्रे झळकणार आहेत. गेल्या १००० वर्षातील इंग्लंडची कल्पना यातून देण्यात येईल, असे रॉयल मिंटतर्फे सांगण्यात आले.

दोन पाउंडाच्या नाण्यांवर शेक्सपिअरची गंभीर व विनोदी नाटके यांची चित्रे असतील. शेक्सपिअरचा मृत्यू होऊन आज ४०० वर्षे लोटली आहेत. ५० पेन्सच्या नाण्यावर हेलन बीट्रिक्स पॉटरच्या परिकथा झळकणार असून तिच्या १५०व्या जयंतीनिमित्त सन्मान म्हणून हा निर्णय घेतला आहे. पॉटर ही इंग्लिश लेखिका, नैसर्गिक वैज्ञानिक म्हणून ओळखल्या जातात. ग्रेट फायर ऑफ लंडनचे चित्रही दोन पाउंडच्या नाण्यावर असेल.