Whats new

कोहली आयपीएलमधील सर्वांत महागडा क्रिकेटपटू

virat

 

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली हा इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वांत महागडा क्रिकेटपटू ठरला आहे. बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सनी त्याच्यासाठी तब्बल १५ कोटी मोजलेत. बंगळुरू संघाने कोहलीला १२.५० कोटी रुपयांना करारबद्ध केले तरी प्रत्यक्षात त्याला १५ कोटी दिले जातात, असे बीसीसीआयच्या संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे.

पुढील दोन हंगामांसाठी पुणे आणि राजकोट या दोन नव्या संघांच्या लिलावादरम्यान पुणे संघाने वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी १२.५० कोटी रुपयांची बोली लागली. मात्र, बीसीसीआयच्या माहितीनंतर आयपीएलमधील लिलावात कोहलीने धोनीलाही मागे टाकले आहे.

संकेतस्थळावरील माहितीनुसार, हरभजन सिंगला ५.५० नव्हे तर ८ कोटी तसेच अंबाती रायडूला ४ नव्हे तर ६ कोटी मिळतात, हे जाहीर झाले आहे. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलची रक्कम ७.५० कोटी दाखवली जात असली तरी त्याला ८.४० लाख रुपये मिळतात, असेही वेबसाइटद्वारे सांगण्यात आले आहे.