Whats new

कृत्रिम पायाने अकोनकागुआ (अर्जेंटिना) सर करणारी जगातील पहिली गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा

arunimasinha

 

कृत्रिम पायाने एव्हरेस्ट सर करणारी जगातील पहिली गिर्यारोहक अरुणिमा सिन्हाने आपल्या शिरपेचात नवा तुरा खोवला आहे. अरुणिमाने अकोनकागुआ (अर्जेंटिना) हे आशियाबाहेरील सर्वात उंच शिखर फत्ते करण्याची कामगिरी केली.

अरुणिमाने ७ समिट मोहिमेत जगातील पाच सर्वात उंच पर्वतशिखरे सर केली आहेत. कृत्रिम पायांच्या साहाय्याने अशी कामगिरी करणारी ती एकमेव महिला आहे.२०११ मध्ये धावत्या पद्मावती एक्स्प्रेसमध्ये बॅग व सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांना अरुणिमाने प्रतिकार केला. यामुळे चाेरट्यांनी तिला रेल्वेबाहेर फेकले. या घटनेत तिला एक पाय गमवावा लागला होता.