Whats new

अबिद अली नीमुचवाला विप्रोचे नवे ‘सीईओ’

abid

 

अबिद अली नीमुचवाला यांची विप्रो या देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या आयटी कंपनीने नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. या पदावरील विद्यमान सीईओ कुरियन यांना कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून बढती देण्यात आली आहे. स्पर्धक माहिती तंत्रज्ञान कंपनी टीसीएसमधून आलेले व विप्रो समूहात गेल्याच वर्षी समूह उपाध्यक्ष म्हणून दाखल झालेले नीमुचवाला नव्या पदाचा कार्यभार स्वीकारतील.

विप्रोने तिच्या संचालक मंडळावरील वरिष्ठ पदांमध्ये आमुलाग्र बदल करताना टाटा समूहातील व देशातील पहिल्या क्रमांकाची आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे नीमुचवाला यांना आपले नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले. ते विप्रो समूहात एप्रिल २०१५ मध्ये समूह अध्यक्ष व मुख्य परिचलन अधिकारी म्हणून दाखल झाले होते. टीसीएसमधील तब्बल २३ वर्षांच्या अनुभवानंतर ते येथे आले होते. तर पुढील वर्षांत वयाची ५८ वर्षे पूर्ण करणाऱ्या कुरियन यांची विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकार म्हणून याच महिन्यात पाच वर्षे पूर्ण होत आहेत.