Whats new

प्रणव धनावडे हजारी मनसबदार! आंतरशालेय क्रिकेटमध्ये रचला विश्वविक्रम

 Pranav

 

कल्याणच्या प्रणव धनावडेची धडाकेबाज खेळी सुरूच आहे. प्रणवने तब्बल नाबाद 1000 धावा ठोकल्या असून जागतिक क्रिकेटमध्ये नवा विश्‍वविक्रम नोंदवला. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एच. टी. भंडारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात प्रणवने ही ऐतिहासिक खेळी केली आहे. प्रणवने पहिले 700 धावांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर 129 चौकार आणि 59 षटकारच्या जोरावर त्याने बघता बघता हजार धावांचा टप्पाही ओलांडला.

दरम्यान, प्रणव यांच्या कामगिरीची दखल राज्य सरकारने घेतली आहे असून, त्याच्या शिक्षण व प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य सरकार उचलणार असल्याची घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. सचिन तेंडुलकरनेही त्याच्या विक्रमाची प्रशंसा केली आहे.